करमाळा (सोलापूर) : भाजपच्या करमाळा ग्रामीण मंडलमधील संघटनात्मक निवडीसाठी मंगळवारी (ता. १७) प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी करमाळा येथील संपर्क कार्यालयात सकाळी १० वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन करमाळा ग्रामीण भाजप मंडळचे अध्यक्ष सचिन पिसाळ यांनी केले आहे.
पिसाळ म्हणाले, करमाळा तालुक्याच्या ग्रामीण मंडलमधील विविध मोर्चे, सेलच्या संघटनात्मक निवडीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर योग्य उमेदवारांच्या निवडी जाहीर होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात भाजप वाढवण्यावर आमचा भर आहे, असे ते म्हणाले.