करमाळा (अशोक मुरुमकर) : मराठा आरक्षणासाठी आपला लढा सुरुच राहणार आहे. त्यावर विचार करण्यासाठी उद्या (रविवारी) अंतरवली सराटी येथे समाज बांधवांची सभा होणार आहे. त्यातच पुढील भूमिका जाहिर केली जाईल, असे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी दिवेगव्हाण येथे सांगितले आहे.
करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाण येथे जरांगे हे आले होते. जेसीबीतून पुष्पवृष्टी व फटाक्यांची अतिषबाजी करत त्यांचे समाजबांधवांनी स्वागत केले. कर्जत व जामखेड येथे भेटी देऊन अंतरवाली सराटी येथे जायचे असल्याचे जरांगे यांनी सांगितले. जरांगे म्हणाले, मराठा समाजाला सरकारने न टिकणारे दहा टक्के आरक्षण दिले आहे, पण ते आम्हाला मान्य नाही. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. सगेसोयरेचा अध्याध्येश लागू करण्यासाठी सरकार टाळाटाळ करत आहे. आता त्यांना आचारसंहितेचे कारण आहे. अशा स्थितीत आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली असल्याचे समजत आहे, असेही ते म्हणाले.