करमाळा (सोलापूर) : कंदरचे सरपंच मौला मुलाणी यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कंदर येथे ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीने झालेल्या मतदानात जगताप गटाचे मुलाणी यांची सरपंचपदी निवड झाली. त्यानंतर सरपंच मुलाणी व सदस्यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते बाजार समितीच्या कार्यालयात सत्कार झाला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, इकबाल हवालदार, अमर भांगे, दीपक घोडकोस, रशिदा शेख, रतन भोसले, कमल लोंढे, अनिता मंजुळे यांचा सत्कार झाला. बाजार समितीच्या संचालिका साधना पवार, कंदर सोसायटीचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब पवार, आदिनाथचे माजी संचालक नवनाथ शिंदे, माजी सरपंच दस्तगीर मुलाणी, संपतराव सरडे, अखलाख जहागीरदार, कांतीलाल पवार, बाबु जहागीदार, वैजीनाथ गुरव, आबासाहेब सुरवसे, राजकुमार सरडे, दिलावर शेख, चंद्रकांत पवार, बापू महाराज सुरवसे आदी उपस्थित होते.