विकासाभिमुख लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी करमाळा शहर विकास पॅनल कटीबद्ध

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहर विकास पॅनल विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी उमेदवारीसाठी संपर्क करण्याचे आवाहन करमाळा शहर विकास पॅनलचे कुणाल पाटील यांनी केले.
डॉ. घोलप, देवी, जगताप, घोरपडे भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक! नगरसेवकसाठी ६८ जणांच्या मुलाखती

पाटील म्हणाले, ‘करमाळा तालुक्याच्या निवडणुका तालुक्याबाहेरील नेतृत्वाच्या अधिपत्याखाली मॅनेज केल्या जातात. यामध्ये केवळ सत्ताकारणाच्या वाटाघाटी होतात. शहर किंवा तालुक्याच्या विकासाबाबत कोणताही हितकारक निर्णय या नेतृत्वाकडून झाल्याचे अद्यापपर्यंत दिसून येत नाही. विकासाभिमुख राजकारणासाठी तालुक्याला तसेच शहराला स्वतंत्र विचाराच्या नेतृत्वाची गरज आहे. करमाळा शहर विकास पॅनल परिवर्तनवादी उमेदवारांना संधी देणार आहे. इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधण्याचे’ आवाहन पाटील यांनी केले आहे.
Video : करमाळ्यात कमळ चिन्हावरच नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडणूक लढणार : कल्याणशेट्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *