करमाळ्याचे उपसभापती ऍड. विघ्ने यांनी घेतली उपमुख्यमंत्री पवार यांची भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ऍड. अजित विघ्ने यांनी उपमुख्यंमत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले असून करमाळा पंचायत समटीमधील सर्व परस्थिती जाणून घेतली आहे, असे ऍड. विघ्ने यांनी सांगितले.

ऍड. विघ्ने म्हणाले, ‘पंचायत समितीमध्ये माजी आमदार संजयमामा शिंदे व बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या नेतृत्वाखाली विजयी मिळवला. त्यानंतर नेते माजी आमदार शिंदे यांनी उपसभापतिपदाची संधी दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आमच्याकडून सर्व माहिती घेतली आहे.’ ‘स्व. अजित पवार यांच्याप्रमाणे सर्वसामान्याची कामे करा.. विकासकामांसाठी अग्रेसर रहा आम्ही कायम तुमच्याबरोबर आहोत’, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांना दिले.

‘माजी आमदार संजयमामांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय व गुळवे यांच्याबरोबर निवडून आल्याचे त्यांना यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी आणखी उत्साहाने पहात आपली चांगली माणसेसोबत आहेत. काम करत रहा.. काही असेल तर भेटत रहा’, असे आवर्जुन सांगितले. पुणे येथील बारामती होस्टेलचे प्रमुख शिवाजीराव काळे, सचिन सातव यांचेसह बऱ्याचजणांशी यावेळी भेटी घेतल्या, असे ऍड. विघ्ने यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *