Karmala Legislative Assembly election will be contested as an independent Zol

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यामध्ये ‌रस्ते, पाणी, वीज याबरोबरच शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग निर्मिती करून सर्वांगीण विकासासाठी आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची भूमिका प्रा. रामदास झोळ यांनी करमाळा येथे पत्रकार परिषदेत मांडली.

शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा संघटक हरिभाऊ मंगवडे, पांडुरंग झोळ, लालासाहेब जगताप, मांगीचे प्रशांत बागल, कुर्डूवाडीतील संतोष बागल, करमाळा शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी तालुकाप्रमुख जितेंद्र सुरवसे, शहरप्रमुख लक्ष्मण यादव, कुंभारवाडा शाखाध्यक्ष सागर परदेशी, सलीम शेख, ओबीसी काँग्रेस तालुकाध्यक्ष गफुर शेख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, प्रा. राजेश गायकवाड, वाशिंबेचे माजी सरपंच अनुरथ झोळ, भगवान डोंबाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सुहास काळे पाटील, बापू गायकवाड, भीमराव ननवरे, संजय जगताप उपस्थित होते.

करमाळा विधानसभासाठी शेवटच्या दिवशी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून ‌प्रा. झोळ यांचे नाव अग्रक्रमावर होते. ‌येथे चार उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यापैकी एका इच्छुक ‌मनोज जरांगे पाटील यांच्या समोरच पाठिंबा जाहीर केला होता. तर बाकीच्या दोघा उमेदवारांनी माघार घेऊन प्रा. रामदास झोळ यांच्या नावाला पाठींबा दिला होता. मात्र मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्याविषयी आढावा घेतल्यानंतर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रा. झोळ यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते.

प्रा. झोळ म्हणाले, ‘करमाळा तालुक्यात आपण नागरिकांना न्याय देण्याचे काम केले असून गावागावांमध्ये दुष्काळात पाण्याचे टँकर, बाकडे, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, रक्तदान शिबिर, नवरात्रीनिमित्त देवदर्शन यात्रा, आराधी गीत स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धाच्या माध्यमातून ‌जनतेपर्यंत पोहोचले आहे. मराठा समाजासाठी आरक्षणाच्या चळवळीत काम केले आहे. मराठा ओबीसी समाजाला इतर समाजाप्रमाणे शैक्षणिक सवलती, वस्तीगृह भत्ता मिळवून देण्याचे काम केले. मराठा समाजाबरोबरही बहुजन समाजाचा ‌आपणास पाठिंबा आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांच्या संमतीनुसार ‌आपण माघार न घेता अपक्ष निवडणूक ‌लढवणार असल्याचे ‌त्यांनी सांगितले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *