करमाळा शहरात काल झालेल्या वादळी वार्यामुळे विज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे पडल्यामुळे तारा तुटल्या आहेत. तर काही ठिकाणी खांब पडून तारा तुटल्या आहेत. विज पुरवठा सुरळीत रहावा म्हणून विज वितरण कर्मचार्यांकडून पेट्रोलिंग करत दुरुस्तीचे काम सुरु आहे. या कामामुळे आज लाईट चालू- बंद करावी लागत आहे. यामुळे ग्राहकांना त्रास होत आहे, मात्र हे काम करणे देखील आवश्यक असल्याने सर्वांनी सहकार्य करवा, असे आवाहन विज वितरण कंपनीने केले आहे.




