करमाळा (सोलापूर) : अंधाराचा फायदा घेऊन एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने आडोशाला थांबलेल्या एका संशयिताविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल गौतम जगदाळे (वय ३३, रा. तरटगाव, ता. करमाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल बापूसाहेब कोकाटे यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (ता. ९) हा गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेला संशयीत जगदाळे हा भवानी नाका परिसरात पान टपरीच्या आडोशाला रात्री पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना आढळून आला. पोलिसांना संशय आल्याने त्याची विचारपूस केली तेव्हा त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. अंधाराचा फायदा घेऊन तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला पकडले. एखादा गंभीर गुन्हा करण्याचा तो प्रयत्न करत असल्याचा संशय आहे. याचा पुढील तपास सुरु आहे.