करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सहकाराचे मंदिर म्हणून ओळख असलेला श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. आणि त्याची सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. २ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून १७ तारखेला मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच बागल गटाने या निवडणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या भूमिकेचे अनेकांनी स्वागत केले आहे. या निवडणुकीमध्ये माघार घेतली असली तरी आता नव्या भूमिकेत हा गट दिसेल, असे चित्र आहे.

‘किंगमेकर’ म्हणून ओळख असलेले विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे हे सध्या बागल गटात सक्रिय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीपासून ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. २०२९ ला मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांना आमदार करायचे अशी बागल गटाची इच्छा आहे. त्यादृष्टीने त्यांनी संपर्कही सुरु केला आहे. राजकारणात अडचणीत येणणाऱ्या मुद्द्यांपासून बागल गट लांब राहत असल्याचे दिसत आहे. त्याचेच हे उदाहरण आहे. (आदिनाथच्या निवडणुकीत बागल समर्थकांनी अर्ज मागे घेणे)

‘वीस वर्षांमध्ये बागल गटाच्या राजकारणाला अडचणीत आणण्यासाठी आदिनाथ कारखान्याला अडचणीत आणून आदिनाथला लक्ष्य केले. आता पुन्हा असा प्रकार होऊ नये आणि बागल गटाला राजकीय लक्ष करण्यासाठी आदिनाथ सुरु होऊ नये, असा प्रयत्न होऊ नये त्यासाठी या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे बागल गटाची भूमिका मांडताना घुमरे म्हणाले आहेत. पुढे बोलताना ‘आम्ही फक्त निवडणुकीसाठी थांबलो आहोत. आदिनाथ व्यवस्थित चालवण्यासाठी आमचे योगदान राहणार आहे. जो कोणी आदिनाथच्या सत्तेवर येईल त्याला बागल गटाच्या वतीने सहकार्य राहील’ अशी ग्वाही देखील घुमरे यांनी दिली आहे. यावरून बागल गट निवडणुकीत कोणाला मदत करणार? असा प्रश्न निर्माण होत असून ते कोणाला विजयी करण्यासाठी मदत करतील हे पहावे लागणार आहे. निवडणुक लागल्यास कोणाला मतदान करायचे हे बागल समर्थक सभासदांना स्पष्ट सांगितले जाणार का? की उघडपणे महायुतीमध्ये पाठींबा दिला जाणार हे पहावे लागणार की आणखी वेगळा काय निर्णय घेतला जाईल हे पहावे लागणार आहे.

बागल गटाला राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी आदिनाथचा वापर झाल्याचा अनेकदा आरोप बागल गटाने केला आहे. ज्या कारखान्याकडे साधणार ८० कोटीची साखर पडून होती तरीही वेगवेगळे आरोप करत कारखाना बंद पाडला गेला. आता ते आदिनाथ बाहेर काढण्यासाठी कसे प्रयत्न करतील? हे बागल गट पाहील. भाजप महिला प्रदेशच्या उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल या बागल गटाच्या नेत्या आहेत. त्यांनीही बागल गटाच्या या निर्णयाला समर्थन दिले आहे. त्यांनी निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला असला तरी कारखान्यात कोणाची सत्ता आणायची यासाठीही हा गट पुन्हा किंगमेकरच्याच भूमिकेत राहील, असे बोलले जात आहे. कारण त्यांचा ज्यांना पाठींबा असेल त्यांना सत्ता आणणे सोपे जाईल, अशी शक्यता आहे.

बागल गटाचा तालुक्यात निष्ठावंत मतदार आहे. गट अडचणीत असला तरी तो त्यांच्याबरोबर कायम राहिला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना 40 हजार 834 मते मिळाली होती. त्यांची मते कमी होतील अशी चर्चा निवडणुकीवेळी होती. पण त्यांचा विश्वास वाढवणारी मते त्यांना मिळाली. त्यामुळे २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी पुन्हा संपर्क सुरु केला आहे. त्यात आदिनाथची निवडणूक महत्वाची ठरणार आहे. या निवडणुकीनंतर आणखी गट उभारी घेईल असे बोलले जाऊ लागले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *