करमाळा तालुका कृषि अधिकारी कार्यालयास IS0 मानांकन

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका कृषि अधिकारी कार्यालयास राज्यातील पहिले रेकॉर्डसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO मानांकन प्राप्त झाले आहे. 31 मार्च 2025 ते 31 मार्च 2028 या कालावधीसाठी हे मानांकन प्राप्त झाले आहे. हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकारी अनिल चव्हाण, मधुकर मारकड, देविदास चौधरी, काशिनाथ राऊत यांच्यासह सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्य्क, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा करमाळा कार्यालयीन कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी यांचे योगदान महत्वाचे आहे.

महाडिबिटीवर येणाऱ्या योजनामध्ये निधी वितरणात 3 वर्षे राज्यात प्रथम क्रमांकवर करमाळा तालुका आहे. केळी क्षेत्र विस्तार व निर्यात हबसाठी केलेले कार्य, ठिंबक सिंचन व यात्रीकरणमध्ये पुणे विभागात चांगले काम व अनुदान वाटप यासह शेतकरी व कर्मचारी यांचेसाठी शुद्ध पाणी, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी, मौखिक व लेखी मार्गदर्शन, शेतकरी अभिप्राय, कृषी ग्रंथालय, कृषी वस्तू संग्रहालय, अदयावत शेतकरी माहिती व प्रशिक्षण कक्ष, नगण्य प्रलंबितता, फ्लो चार्ट, माहिती चार्ट, अभिलेख वर्गीकरण, सुसज्ज बैठक व्यवस्था, प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यास आईच्या नावासह नाव निर्देशित प्लेट, सर्वांना आयकार्ड, सर्वधर्मसमभावसाठी एक गणवेश, तालुका कृषी अधिकारी कार्यक्षेत्रातील सर्व गावांचा अद्यावत मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये सुपीकता निर्देशांक चार्ट, अधिकारी कर्मचारी यांचे गावभेटीचे दिवससह सूक्ष्म नियोजन, कृषी व शेतकरी कुटुंब सेवार्थ कार्य, राज्य व केंद्रशासन धोरण व योजना यांची उत्कृष्ट अंमलबजावणी, कार्यालय रंगरंगोटी, AI तंत्रज्ञान यांचा वापर इत्यादी अनेक बाबींची अंमलबजावणी नंतर सर्वेक्षण वअंकेक्षण, ॲडीट वर आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा मानांकन मिळवण्याचा मान या कार्यालयास प्राप्त झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *