करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाचे भविष्य बदलवणार : आमदार शिंदे

-

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायीनी असलेली दहिगाव उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने चालविणार असून आवर्तन कालावधीमध्ये एखादा पंप जळाल्यास त्याचा परिणाम आवर्तनावर होतो. त्यामुळे दहिगाव टप्पा १ येथे अधिकचा १ पंप व कुंभेज टप्पा २ येथे अधिकचा १ पंप असे २ पंप बसविणार आहे. त्यामुळे एखादा इलेक्ट्रिक पंप जळाल्यास त्याचा परिणाम आवर्तनावर होणार नाही, योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले आहे.

फिसरे येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी विलास दादा पाटील, तानाजी झोळ, संजय घोलप, गणेश चिवटे, जगदीश अग्रवाल, रामा ढाणे, भरत अवताडे, अमोल महाराज काळदाते, गौतम ढाणे, राजेंद्र बाबर, सूर्यकांत पाटील, ऍड. अजित विघ्ने, दत्ता अडसूळ, विवेक येवले, मानसिंग खंडागळे, राहुल कुकडे, सचिन वीर, प्रदीप दौंडे, संदीप नेटके आदी उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांची बारमाही पिके चांगली यावीत यासाठी आपण सिंचनाचे प्रश्न सोडवण्यावर लक्ष देत आहे. दहिगाव उपसाच्या पट्ट्यातील गावांमध्ये शेतकरी ऊसाबरोबर केळीकडे वळले आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणारे पाणी आपण त्यांना पूर्ण क्षमतेने बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देऊ. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये निश्चितच समृद्धी येईल आणि ही समृद्धी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाचे भविष्य निश्चितच बदलवेल, असे ते म्हणाले. डॉ. विकास वीर, चंद्रकांत सरडे आदींनी यावेळी मनोगते व्यक्त केले. यावेळी शेलगाव क, पांडे व कोळगाव येथील अनेकांनी आमदार शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *