जगताप गटाचे नेते वैभवराजे जगताप, आरपीआयचे गाडे प्रा. झोळ यांच्या भेटीला

Leader of Jagtap group Vaibhavraje Jagtap met RPI Gade Prof Jhol

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्यासाठी शुक्रवारी (ता. 16) मतदान होत असून या पार्श्वभूमीवर बागल विरोधी गटाचे पॅनल प्रमुख प्रा. रामदास झोळ यांच्या भेटीला जगताप गटाचे नेते माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप व आरपीआयचे अर्जूनराव गाडे हे आले आहेत. बारा बंगला येथील संपर्क कार्यालयात त्यांनी ही भेट घेतली असून यावेळी त्यांच्यात चर्चा झाली आहे. या निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सुरुवातीलाच प्रा. झोळ यांना पाठींबा जाहिर केला होत. आता दोघांमध्ये भेट होऊन चर्चा झाली आहे. राजकीय दृष्ट्या ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. यावेळी आमदार संजयमामा गटाचे समर्थक वामनराव बदे उपस्थित होते.

जगदाळे यांचा वाढदिवस…
माजी आमदार नारायण पाटील गटाचे समर्थक पंचायत समितीचे उपसभापती नितीन जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त येथे केकही कापण्यात आला. यावेळी मांगी गटातील उमेदवार सुभाष शिंदे, पोथरे येथील हरिभाऊ झिंजाडे, काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गफूरभाई शेख, माजी सरपंच भगवानराव डोंबाळे हे देखील यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *