Live : बागल गटाचा विजय निश्चित झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये वाढला उत्साह

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत बागल गटाचे सर्व उमेदवार आघाडीवर आहेत. यामुळे बागल गटाच्या सर्व उमेदवारांचा विजयी निश्चित झाला आहे. त्यामुळे बागल गटाचे सर्व कार्यकर्ते बागल गटाच्या संपर्क कार्यालयात जमा होऊ लागले आहेत. बागल गटाचे नेते दिग्विजय बागल हे कार्यालयात आले असून त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागले आहे.

बागल गटाचे उमेदवार भिलरवडी गटातील अजित झांजुर्णे यांना ३४३४ व रामभाऊ हाके यांना ३४८९ मते पहिल्या फेरीत आहेत. विरोधी गटाचे सुनीता गिरंजे यांना ८४३ व अप्पासाहेब जाधव यांना ७३० मते आहेत. अजून मतमोजणीचा अधिकृत निकाल आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसारची ही आकडेवारी आहे. बागल गटाच्या संपर्क कार्यालयात केरू गव्हाणे, शिवाजी राक्षे, विजय लावंड, सचिन घोलप, हरिशचंद्र झिंजाडे, सुरेश हळणवर, रवींद्र शेळके, सचिन मुळीक, गणेश तळेकर, सौदागर दौड, राजेंद्र झांजुर्णे, संतोष लष्कर, महादेव उकले, हनुमंत उकले, सागर शिर्के, दशरथ गुंजाळ, किरण सातव, आबासाहेब भोसले, क्रुष्णा उकले, विकास शिर्के, सचिन गदादे, मोहन झांजुर्णे, राजेंद्र जगताप, बाळासाहेब शिर्के, गणेश धुमाळ, रफिक शेख, सुनील भांडवलकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *