करमाळा (सोलापूर) : कंदर येथील प्रगतशील शेतकरी संदीप पराडे यांच्या शेतीला युनायटेड किंगडम या देशातील जागतिक बँकेच्या सल्लागार लुसी म्याथूसन यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. स्मार्ट प्रकल्पांतर्गत निर्यात वाढवण्यासाठी महाराष्ट्र मार्केटिंग इंटेलिजन्स सेल स्थापन करणेसाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने पाच दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्येशाळेसाठी लुसी म्याथूसन, जागतिक बँक सल्लागार, युनाइटेड किंगडम या उपस्थित होत्या. नवीन नवीन तंत्रज्ञानद्वारे पीक उत्पादन घेत असलेल्या शेतीला भेट देऊन त्यांनी माहिती जाणून घेतली.
संदीप पराडे हे त्यांचे वडील रमेश पराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत असून आधुनिक पद्धतीने केलेले योग्य नियोजन आणि सर्वाधिक उत्पादन क्षमता यासाठी त्यांनी त्यांच्या शेतात नियोजन केले. त्यांनी विविध पिके लागवड करून सर्वाधिक उत्पादन घेण्यात आघाडीवर आहेत. त्यांनी केळी, डाळिंब, आद्रक अशी त्यांची सध्या पिके असून सर्व पिके निर्यातक्षम आहेत. सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेती उत्पादन वाढवण्यावर त्यांचा भर असतो जागतिक बँक सल्लागार यांनी शेती पाहून समाधान व्यक्त केले. जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी शुक्राचार्य भोसले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, अनिल गवळी धोरण विश्लेषक स्मार्ट प्रकल्प, प्रदीप लाटे- प्रकल्प संचालक आत्मा अहिल्यानगर, वैभव शिंदे, प्रकल्प व्यवस्थापक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, शुक्राचार्य भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी काशिनाथ राऊत, उपकृषी अधिकारी ज्ञानेश्वर सरडे, सहायक कृषी अधिकारी, राजाभाऊ महाडिक, सहाय्यक कृषी अधिकारी वाल्मीक चौधरी, डाळिंब सल्लागार संदीप भोरे, केळी एक्सपोर्टचे किरण डोके, संतोष खानट आदी शेतकरी उपस्थित होते.