अशोक मुरूमकर
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निमित्ताने अनेक चर्चा सुरु आहेत. कोणाचा विजय होणार? आतापर्यंत कोणी काय केले? कोणाचा वचपा काढायचा? अशा अनेक चर्चा सध्या सुरु आहेत. महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये ही प्रमुख लढत मानली जात असून दोन्हीही बाजूने तेवढाच युक्तिवाद केला जात आहे. कोण म्हणत ही निवडणूक मोदी विरुद्ध गांधी तर कोण म्हणत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीही लढत आहे. स्थानिक पातळीवर वेगवेगळे संदर्भ जोडून युक्तिवाद केले जात आहेत. त्यात माढा मतदारसंघात शिंदेंविरुद्ध मोहिते पाटील अशी ही निवडणूक असल्याचे बोलले जात आहे. त्यात एकाची कॉमेंट चर्चेत आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसने काय केले असा भाजपचा तर भाजपने काय केले असा काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेनेचे (ठाकरे गट) समर्थक भाजपवर टीका करतात. स्थानिक पातळीवरही एकमेकांचे विरोधक आरोप- प्रत्यारोप करत आहेत. विकास कामांवरही सध्या चर्चा सुरु असून त्यात एकाने केलेली कमेंट चर्चेत आली आहे.
फेसबुक वॊलवरही सध्या प्रमुख गटाकडून व पक्षांकडून सतत वेगवेगळ्या राजकीय पोस्ट केल्या जात आहेत. त्यात एक पेजवर विकास कामांबाबत केलेल्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यापैकी राम कदम यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘सर्वांना अगदी मनापासून विनंती आहे, माढा लोकसभा निवडणुक ही शिंदे परिवार विरुद्ध मोहिते पाटील अशी नाही आहे. त्याला तसा कोणी रंगही देऊ नये. त्यासाठी थोडे समजून घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाविषयी चीड निर्माण झाली आहे. शेतकरी अडचणीत आहे. अनेक तरुणांना रोजगार नाही, खासदार निंबाळकर यांची कामगिरी खराब आहे. याठिकाणी मोहिते पाटील भाजपाकडून उभे राहिले असते, तर आपण सर्व दादा, मामाप्रेमीनी मोदींना मतदान केले असते का? तर नाही. दादा व मामा यांच्या पाठीशी माढा तालुक्यातील नागरिक खंबीरपणे उभा आहेत. कारण माढा तालुक्याचा विकास दादा व मामा यांनी केला आहे. आज वेळ वेगळी आहे, भाजपाचे धोरण शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांच्या आयुष्यात माती कल्वणारे आहे. सगळ्यात मोठा विषय म्हणजे आज शरद पवार व उद्धव ठाकरे अडचणीत आहेत. लोकशाही अडचणीत आहे, त्यामुळे यावेळी तुतारी फुंकली पाहिजे.’
चर्चा तर होणारच! ‘जावयाने सासऱ्याला सांगितले तुम्ही मी सांगतो त्यालाच मतदान करा नाही तर…’
Loksbha election करमाळ्यात सोमवारपासून महायुतीच्या सभांचा धडाका! संपुर्ण तालुक्यात ‘असे’ असणार नियोजन
माढा लोकसभा मतदारसंघात निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशी सरळ लढत असली तरी शिंदे विरुद्ध मोहिते अशी निवडणूक असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात मोहिते व शिंदे यांच्या प्रतिष्टेची ही निवडणूक समजली जात आहे. या निवडणुकीनंतर अनेक समीकरणे बदलली जातील, अशी शक्यता असून दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये श्रेयवाद सुरु असून असे रंग देण्यात येऊ नयेत असे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ग्रामीण भागात सध्या भाजपच्या विरुद्ध लाट असल्याचे चित्र आहे. याचा फटका खासदार निंबाळकर यांना बसण्याची शक्यता आहे. मात्र जशी निवडणूक जवळ येत आहे, तसे वातावरणही तापत आहे.