करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत बागल गटाचे सर्व उमेदवार आघाडीवर आहेत, अशी माहिती बागल गटाचे उमेदवार रामभाऊ हाके यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलला बाहेर आल्यानंतर दिली आहे. अजूनही मतमोजणी सुरु असून या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मकाई साखर कारखान्याच्या १७ संचालकांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील आठ जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर नऊ जागांसाठी मतदान झाले. त्याची मतमोजणी आज सुरु आहे. मतपत्रिकेची विभागणी झालेली असून त्याची मोजणी सुरु आहे. यामध्ये बागल गटाचे सर्व उमेदवार लीडवर आहेत. बागल गटाचे उमेदवार रामभाऊ हाके यांच्या माहितीनुसार प्रत्येक मतदान केंद्रात विरोधी गटाला २०- २५, ३०-४० अशी मते जात आहेत. भगतवाडीला मात्र दोन्ही उमेदवारांना सामान मते असल्याचे चित्र आहे. मात्र अजूनही मतमोजणी सुरु आहे. पहिली फेरी साधारण १२ वाजेपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. हाके हे मतदान मोजणीच्या ठिकाणी आहेत. मात्र नाश्ता करण्यासाठी ते बाळासाहेब यांच्या हॉटेलमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली आहे.