करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार संजयमामा यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करत ऍड. नागनाथ कारंडे यांनी पंचायत समितीच्या पांडे गणासाठी आज (रविवार) उमेदवारी मागितली आहे. पांडे गणातील प्रत्येक गावातून प्रमुख कार्यकर्ते घेऊन त्यांनी निमगाव येथे शक्तिप्रदर्शन केले. ‘माजी आमदार शिंदे यांच्या विकासकामांमुळे आपण प्रवेश करत असून त्यांनी मला निवडणूक लढवण्याची संधी द्यावी’, अशी मागणी केली आहे.
पांडे गणात १७ हजार ९४५ मतदान असून पांडे, खांबेवाडी, धायखिंडी, पोथरे, निलज, बिटरगाव श्री, बोरगाव, घारगाव, पाडळी, पोटेगाव, बाळेवाडी, देवीचामाळ, तरटगाव, दिलमेश्वर व वडाचीवाडी ही गावे आहेत. ऍड. कारंडे यांनी या गणात शिंदे यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे. त्यांनी कोरोना काळात उल्लेखनीय काम केले आहे. याशिवाय सामाजिक कामात त्यांचे योगदान आहे. त्यांचे बंधू आबासाहेब कारंडे हे नेर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत.
ऍड. कारंडे यांच्या प्रवेशावेळी बोरगाव येथील विनय ननवरे, पाडळीचे गौतम ढाणे, वाघाचीवाडी येथील देविदास वाघ, श्रीदेवीचामाळ येथील अनिल पवार, श्रीराम फलफले, पप्पू हिरगुडे, पांडे येथील ज्ञानदेव क्षीरसागर, नागनाथ राऊत, धंनजय शिंदे, शहाजी झिंजाडे, बापू मुरूमकर, प्रवीण घोडके, गणेश लोहार, तात्यासाहेब पाटील, डॉ. सुभाष शेंद्रे, सतीश नरुटे, राहुल चोरमुले, जयदीप ननवरे, दयानंद पवार, सुमित पवार, अनिल शिंदे, शंकर कोळेकर, किशोर नलवडे, लालासाहेब भागडे, दत्तू मस्के आदी उपस्थित होते.
