करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मांगी व पोथरे परिसरात बिबट्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे गटाचे पोथरे येथील कार्यकर्ते शहजी झिंजाडे यांनी केली आहे. मांगी येथे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे. त्यानंतर एका वासरावर हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. सध्या पाऊसही लांबला आहे. त्यामुळे ऊसाला व इतर पिकांना पाणी देण्यासाठी लगबग सुरु आहे. त्यात बिबट्यामुळे भिती आहे. याकडे गांभीर्याने पाहुन विज वितरण कंपनीने मांगी, पोथरे, बिटरगाव श्री, आळजापूर भागात दिवसा विजपुरवठा करावा, अशी मागणी झिंजाडे यांनी केली आहे.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2023/08/Pol-Add-707x1024.jpg)