करमाळा बाजार समितीच्या संचालिकापदी मनीषा देवकर यांची निवड

करमाळा (सोलापूर) : विधानसभा निवडणुकी दरम्यान साधना पवार यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर केम येथील मनीषा देवकर यांची निवड करण्याचा निर्णय माजी आमदार सभापती जयवंतराव जगताप यांनी घेतला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.

सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक अपर्णा यादव, बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर, उपसभापती शैलजा मेहेर, संचालक शंभूराजे जगताप, नवनाथ झोळ, सागर दौंड, तात्यासाहेब शिंदे, रामदास गुंडगिरे, बाळासाहेब पवार, कुलदीप पाटील, काशिनाथ काकडे, मनोज पितळे, परेश दोशी, वालचंद रोडगे, शिवाजी राखुंडे, जनार्धन नलवडे, महादेव कामटे, नागनाथ लकडे आदी उपस्थित होते. या निवडीनंतर देवकर यांचा माजी आमदार जगताप व सहाय्यक निबंधक यादव यांनी सत्कार केला. सहाय्यक निबंधक यादव यांची बदली कराड येथे जिल्हा उपनिबंधक पदी झाली आहे. त्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *