करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरामध्ये घरोघरी जाऊन कचरा संकलित करणाऱ्या घंटागाड्यावर मराठी गाणं लावण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी केली होती. त्याला यश आले असून मराठीत गाणं सुरु झाले आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असल्याने महाराष्ट्रातील मराठी नागरिकांसाठी अभिमानाची बाब असल्याचे घोलप यांनी म्हटले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार करमाळा मनसे तालुका प्रमुख घोलप यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे मराठी गाणे सुरु करण्याबाबत निवेदन दिले होते. त्याची दखल घेतली आहे.