करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आज (शनिवारी) डॉक्टर्स डे निमित्त सकाळी ६ वाजता करमाळा शहरातील कर्जत रोडवरील नागोबा मंदिर ते घोलप फार्म दरम्यान ‘मॅरेथॉन’ आयोजित करण्यात आली होती. पाच किलोमीटरच्या या मॅरेथॉनमध्ये करमाळा शहर व तालुक्यातील डॉक्टरांनी सहभाग घेतला.
‘रुग्णांचे काळजी घेत डॉक्टरांनी स्वतःच्याही आरोग्याकडे लक्ष द्यावे, या हेतूने ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती,’ असे डॉ. अविनाश घोलप यांनी सांगितले.
या मॅरेथॉनमध्ये डॉ. बिपिन परदेशी, डॉ. अनुप खोसे, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. रविकिरण पवार, डॉ. चंद्रकांत सारंगकर, डॉ. विशाल शेटे, डॉ. पोपट नेटके, डॉ. माही भोसले, डॉ. महेश दुधे, डॉ. विनोद गादिया, डॉ. राजेश शहा, डॉ. रोहन जाधव पाटील, डॉ. नागनाथ लोकरे, डॉ. प्रमोद कांबळे, डॉ. महेश वीर, डॉ. प्रतिक निंबाळकर, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. मनोज काळे यांच्यासह डॉ. वैशाली घोलप, डॉ. सुनिता जोशी, डॉ. कविता कांबळे, डॉ. प्रिती शेटे, डॉ. वैशाली खोसे, डॉ. अपर्णा भोसले, डॉ. मेघना निंबाळकर आदींनी सहभाग घेतला होता