करमाळा (सोलापूर) : केम येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये मारकड वस्ती (चिखलठाण) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने लहान गट मुलींच्या कबड्डीच्या अंतिम सामन्यात हिवरवाडी संघावर दणदणीत विजय मिळवला आणि जिल्हास्तरीय स्पर्धेस पात्र झाला. अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये मारकड वस्तीच्या शाळेने सहा गुणांनी विजय मिळवत विजय खेचून आणला. कमी पटसंख्या असतानाही शांत संयमी खेळ करत समोरच्या संघावर यशस्वीपणे मात केली. करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, विस्तार अधिकारी नितीन कदम, मिनीनाथ टकले, केंद्रप्रमुख वंदना पांडव, रमाकांत गटकळ, लक्ष्मण भंडारे, चिखलठाणचे विकास गलांडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश मारकड यांनी मारकडवस्ती शाळेचे मुख्याध्यापक आणि मार्गदर्शक तात्यासाहेब जगताप, सहशिक्षिका स्वाती जगताप पाटील यांचे अभिनंदन केले.
By kaysangtaa.21
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४