आमदार शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! निवडणूक जाहीर होण्यापूर्वी करमाळकरांच्या पाण्यासाठी मिळवला दीड कोटींचा निधी

Masterstroke of MLA Shinde A fund of one and a half crores was obtained for the water of Karmal Tax before the election was announced

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरासाठी उजनी जलाशयातून पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव पंपहाऊस येथे २४० अश्वशक्तीचे दोन विद्युत पंप खरेदीसाठी नगरपालिका प्रशासनाने निधीची मागणी केल्यानंतर आमदार संजयमामा शिंदे यांनी अवघ्या महिनाभरातच १ कोटी ४० लाख निधी मंजूर करून घेतला आहे. यामुळे आता करमाळेकरांसमोरील कृत्रिम पाणीटंचाईचे संकट लवकरच संपुष्टात येणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी हा निधी मिळवला आहे.

१९९३ मध्ये दहिगाव येथून कार्यान्वित झालेल्या या योजनेसाठी २४० अश्वशक्तीचे दोन व २०० अश्वशक्तीचा एक असे तीन पंप बसवण्यात आलेले असून हे पंप जुने झाल्याने बिघाड, दुरुस्ती या कारणामुळे शहराचा पाणीपुरवठा उजनीत तुडुंब असतानाही विस्कळीत होत होता. त्यातून निर्माण होणाऱ्या कृत्रिम पाणीटंचाईमुळे शहरवाशीय हैराण झालेले होते. आता आमदार शिंदे यांच्या माध्यमातून पंप खरेदी करण्यासाठी तातडीने निधी मंजूर झाल्याने नवीन पंप बसविल्यानंतर शहरासमोरील पाणीसंकट कायमस्वरूपी दूर होणार असल्याने शहरवाशीय आणि विशेषतः महिला वर्गाकडून आमदार संजयमामा शिंदे यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून या कृत्रिम पाणीटंचाईमुळे शहरवाशीय त्रस्त झाले होते. प्रशासनाच्या मागणीनंतर आमदार शिंदेनी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे ही कृत्रिम पाणीटंचाई संपणार आहे. या कार्यतत्परतेबद्दल महिलावर्गाकडून मामांना धन्यवाद देण्यात येत आहेत, असे शिवसेना तालुका महिला आघाडीच्या प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *