पुणे : येथील विधानभवन येथे सोलापूर जिल्ह्याच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज (शुक्रवारी) बैठक झाली. या बैठकीसाठी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पवार, कार्यकारी अभियंता उजनी लाभक्षेत्र त्याबरोबर करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, पंढरपूर- मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उजनी पर्यटन विकास आराखडा सादर केला. या आराखड्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रस्ताव तपशीलवार दाखल करावेत तसेच तात्काळ सुरुवातीस १०० कोटी देण्याचे मान्य केले आहे. पर्यटनामुळे उजनी लाभक्षेत्रातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्राशी संबंधित व्यवसायास चालना देणाऱ्या सर्व धार्मिक तसेच कृषी पर्यटन चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन विषयकौशल्यावर आधारित उपयोगाच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये टूर्स गाईड, वाहन व्यवसाय, बांधकाम, स्वयंरोजगार स्वच्छता सेवा, प्लंबिंग, कृषी मालाला स्टेट बाजारपेठ त्याचबरोबर उजनी परिसरातील ग्रामस्थांना स्वयंरोजगार प्राप्त होईल. त्याचबरोबर समुदाय आधारित संस्थांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत्र निर्माण होणार आहे.
याबाबतीत आमदार शिंदे म्हणाले, बरेच दिवसापासून पाठपुरावा करून तत्कालीन जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी बैठका घेतल्या होत्या. त्याला आज मूर्त स्वरूप आताचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचेमुळे झाले. उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रस्ताव मान्य करून येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूरी देण्याचे मान्य केले आहे.
उजनी जलाशयातील पक्षी वैभवमध्ये भर पडणार आहे. तब्बल 230 पक्षाच्या प्रजाती देशी-विदेशी पक्षाचे स्थलांतर यानिमित्ताने पक्षी पर्यटना चालना भेटणार आहे. तसेच वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज निर्माण केल्या जाणार आहेत. यामध्ये यात क्लब वॉटर लाईट हाऊस आकर्षक पेडल बोर्ड इत्यादी बोटिंग संदर्भातल्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील जे धार्मिक क्षेत्र आहेत त्या धार्मिक क्षेत्रासाठी वेगवेगळ्या राज्यातून येणाऱ्या लोकांसाठी पर्यटन क्षेत्राकडे वळवण्यासाठी मदत होणार आहे.