करमाळा (सोलापूर) : शेतमाल बाजारात विकण्यापेक्षा प्रक्रिया करून त्याची विक्री केल्यास जादा फायदा होत असल्याने शेतकऱ्यांना भरघोस अनुदान मिळणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी शेटफळ येथे केले.
कृषी प्रक्रिया जागृती पंधवड्यानिमीत्त शेटफळ येथे कार्यक्रमात ते बोलत होते. कृषी विभागाच्या वतीने शेटफळ परिसरातील कृषी प्रक्रिया उद्योग करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांचा मेळावा यावेळी झाला. वाकडे म्हणाले, शेतमालावर प्रक्रिया केलेल्या छोट्या उद्योगातून रोजगारनिर्मिती बरोबरच शेतमालाचे मूल्यवर्धन होत असल्याने शेतकऱ्यांसाठी ते फायदेशीर ठरत आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी आपले छोटे उद्योग सुरू केले आहेत. त्यांना चांगली बाजारपेठ ही मिळत आहे. या मालासाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
कृषी सहाय्यक सुप्रिया शेलार यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेचे समन्वयक मनोज बोबडे यांनी कोणकोणते व्यवसाय या अंतर्गत केले जाऊ शकतात व त्यासाठी कर्ज अनुदान व लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देऊन उपस्थित इच्छुक शेतकऱ्यांचे यासाठी प्रस्ताव तयार केले. यावेळी यशस्वी कृषि प्रक्रिया उद्योग करणाऱ्या महिला उद्योजका मंदाकिनी चव्हाण व मनिषा बोराडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कृषी पर्यवेक्षक मधुकर मारकड, कृषी लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष वैभव पोळ, संचालक नानासाहेब साळुंके, विलास लबडे, कैलास लबडे, अशोक लबडे, समाधान गुंड, रणजीत लबडे, शिवाजी वाघमारे, सुहास पोळ, रोहित लबडे, विजय लबडे, महावीर निंबाळकर, सुंदरदास पोळ, प्रमोद पोळ, कृषी सहाय्यक रोहिणी सरडे, जिजामाता महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा हर्षाली नाईकनवरे, रेणूका लगड, समर्थ बचत गटाच्या अध्यक्षा शोभा गुंड, नागनाथ गटाच्या सुशीला गुंड, जगदंबा गटाच्या, जयश्री शिंदे, मातोश्री गटाच्या अश्विनी पोळ, पंचशील गटाच्या नगीना पोळ, कृष्णाई गटाच्या शकुंतला लबडे, श्री गणेशा गटाच्या निर्मला लगड, आश्विनी पोळ व गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार प्रशांत नाईकनवरे यांनी मानले.