करमाळा (सोलापूर) : खांबेवाडी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मनसेचे तालुका उपाध्यक्ष अशोक गोफणे यांच्या वतीने पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी आजी- माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय व ज्येष्ठ नागरिक यांचाही सन्मान झाला. माजी सैनिक शंकर कोळेकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन गोफने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्याध्यापक पोपट पाटील, यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. ग्रामपंचायत सदस्य आजिनाथ शिंदे व रुपेश लांडगे यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
खांबेवाडीत स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
