जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळजापुर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

करमाळा (सोलापूर) : आळजापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अशोका फाउंडेशन व स्व. अशोक रोडे पाटील प्रतिष्ठाणच्या वतीने सातवी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व MPSC परीक्षेत PSI झालेल्या गणेश वाकळे, SRPF मध्ये नुकतेच भरती झालेले निखिल काळे, अजित रोडे यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भागवत भंडारे होते. सरपंच संजय रोडे, राजेंद्र रोडे, विश्वंभर रोडे पाटील, दिगंबर रोडे, सुभाष रोडे, बिभीषण खरात, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय टेंबाळे, उपाध्यक्ष विजय गपाट, तलाठी श्री. कोल्हे, शरद रोडे, ग्रामपंचायत सदस्य महादेव गायकवाड, पार्वती रोडे, वछला काळे, रंगनाथ काळे, ज्ञानदेव कुंभार, तात्यासाहेब काळे, विष्णू काळे, पांडुरंग रोडे, विष्णू आखाडे, सुनील काळे, सूरज शिंदे, सोमनाथ रोडे, आबासाहेब रोडे, रामभाऊ वाकळे, दत्ता रोडे, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *