‘आदिनाथ’ सुरु करण्यासाठी आमदार पाटील यांच्या हालचाली! ऊस तोडणी वाहतुकीच्या कराराचा शुभारंभ

करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा 2025 – 26 गाळप हंगाम सुरु करण्यासाठी आमदार नारायण पाटील यांचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. या हंगामासाठी ऊस तोडणी वाहतुकीच्या कराराचा शुभारंभ कार्यकारी संचालक अरुण बागनवर, कार्यालयीन अधिक्षक श्री. कदम व शेती अधिकारी सर्जेराव राऊत यांच्यासह कर्मचारी व वाहनमालक यांच्या उपस्थितीत झाला.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच झाली आहे. यामध्ये माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पॅनलचा पराभव करत आमदार शिंदे यांचा पॅनल विजयी झाला होता. त्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत पाटील हे कारखान्याचे अध्यक्ष झाले तर महेंद्र पाटील हे उपाध्यक्ष झाले. कारखाना सुरु करण्यासाठी आमदार तथा अध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. त्यानंतर आता कारखान्याचे कार्यकारी संचालक बागनवर यांच्या उपस्थितीत ऊस तोडणी वाहतूकदारांचा करार शुभारंभ झाला झाला असल्याचे माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे.

आदिनाथ कारखाना हे शेतकऱ्यांचे सहकाराचे मंदिर मानले जाते. गेल्या काही दिवसांपासून हा कारखाना बंद आहे. हा कारखाना सुरु झाला तर इतर कारखान्याच्या दरावर परिणाम होतो. ऊस पट्ट्यात आणि हायवे रोड लगत हा कारखाना आहे. मात्र आर्थिक अडचणीमुळे हा कारखाना बंद पडला होता. आदिनाथ कारखाना निवडणुकीत पाटीलविरुद्ध शिंदे अशी लढत झाली होती. निवडणुकीतही कारखाना सुरु करण्यावर अनेक चर्चा झाल्या होत्या. आता कारखाना सुरु करण्यासाठी पाटील यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *