करमाळा (सोलापूर) : रावगाव येथील पोलिस भरती झालेल्या दोघांचा आमदार संजयमामासाहेब शिंदे युवा मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला. अमिर आतार यांची दौंड SRPF गट क्रमांक 7 व आदित्य गिरीगोसावी यांची बीड ग्रामीण पोलिसमध्ये निवड झाली आहे. या दोघांचाही सत्कार करण्यात आला. संरपच किरण फुंदे यांच्या नेतृत्वाखाली रावगाव येथे लाडु वाटून व फटाके वाजवून गुलालाची उधळून करत मोठया उत्साहात मिरवणूक काढत सत्कार करण्यात आला. यावेळी आयुब शेख, नसीर शेख, पंजाब शेख, महादेव धगाटे, मारूती धगाटे, श्री. बरडे, ईस्ञाईल शेख, सोहेल शेख, रफिख शेख, पवण पवार, ओंकार गोसावी, असद शेख, शबीर शेख, गुलुचाचा शेख, मोजम अंगारशा आदी उपस्थित होते.
रावगाव येथील पोलिस भरती झालेल्या दोघांचा आमदार संजयमामासाहेब शिंदे युवा मंचच्या वतीने सत्कार
