करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘राजकारण करत असताना मी कायम विकासाचे केले आहे. तुम्ही मला पाठींबा दिला असल्याने माझे नक्कीच बळ वाढले आहे. काम करत असताना तुमच्या विचारला कधीच माझ्याकडून धक्का लागणार नाही’, अशी ग्वाही आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

नागेश कांबळे यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत पाठींबा जाहीर केला आहे. यावेळी नागरिक संघटनेचे कन्हैयालाल देवी, विलास पाटील, सुहास गलांडे, विजयराव पवार, लक्ष्मण भोसले, तानाजी झोळ, सुजित बागल, शरद पवार, महादेव फंड, विवेक येवले, नाना मोरे आदी उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला सर्व घटकांना बरोबर घेऊन चालायचे आहे. राजकारणात काहीही तरी आपले विचार कायम ठेवले पाहिजेत. तुम्ही विचाराचे पक्के असून मला पाठींबा दिला असला तरी तुमच्या विचाराला माझ्याकडून कधीही धक्का लागणार नाही. विकास काम करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपले विचार महत्वाचे आहेत, असेही आमदार शिंदे म्हणाले.

नागेश कांबळे म्हणाले, दलित समाजाला यावेळी किंगमेकर होण्याची संधी आली आहे. तालुक्याचा सर्व विचार करून व कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही आमदार शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार शिंदे यांच्या मागे मी पूर्ण ताकद उभा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. विवेक येवले, देवी भोसले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. भीमराव कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *