Video : करमाळ्यासह विस्तारित भागाचाही विकास करणार : करमाळा शहर विकास आघाडीच्या मोहिनी सावंत

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहर व विस्तारित भागाला पूर्ण दाबाने तीन तास पाणी पुरवठा करण्यात येईल. याशिवाय आरोग्य, रस्ते, प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढवला जाईल. स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना अभ्यासिका उभारली जाईलमहिला सक्षमीकरणाला भर दिला जाईल, असे करमाळा शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मोहिनी सावंत यांनी ‘काय सांगता’शी बोलताना सांगितले.

सावंत म्हणाल्या, ‘करमाळा शहराच्या विस्तारित भागात तीन तास पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्यात येईल. आवश्यक तेथे पाणी टाक्या उभारल्या जातील रस्ते, वीज, आरोग्य व शिक्षण हे मूलभूत प्रश्न सोडवले जातील. नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश असलेल्या पालकांना घरपट्टीमध्ये सवलत देणार. सर्व शहरात सीसीटीव्ही बसवले जातील.

पुढे बोलताना सावंत म्हणाल्या, ‘शहरातील नागरिकांसाठी अल्पदरात मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले जाईल. जीन मैदान शॉपिंग सेंटर येथे कायमस्वरूपी सफाई कामगार नेमले जातील. भुयारी गटार योजना राबवली जाईल. नगरपरिषदेच्या अंतर्गत असलेल्या शाळा अत्याधुनिक साधनांसह डिजीटल बनवण्याचा प्रयत्न राहील. आरोग्य सुविधांमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा बळकट केली जाईल.

करमाळा शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी दहिगाव उपसासिंचन येथे सोलर पॅनलची व्यवस्था केली जाईल. त्यामुळे वीज बिल देखील कमी होईल. विस्तारित भागात आवश्यकतेनुसार उंच पाणी टाकी उभारल्या जातील. शहरात प्रत्येक प्रभागात मागणीनुसार सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिरिक्त टाक्या बांधून केली जाईल.

उद्याने उभारणार
करमाळा शहरातील नागरिकांसाठी महावीर उद्यानाला गतवैभव प्राप्त करून देऊन कायमस्वरूपी सुस्थितीत ठेवण्यासाठी कायमस्वरूपी तेथे एक बागमाळी नेमण्यात येईल. नाना- नानी पार्कचे सुशोभीकरण करणे जाईल. शहरातील ओपनस्पेसमध्ये क्रीडांगण व चिमुकल्यांसाठी खेळणी बसवण्यात येतील.

काय केले जाणार?
नागरिकांचे काम जलदगतीने व्हावीत यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात येईल, नागरिकांना कर व इतर बिल भरण्यासाठी नगरपालिकेत सुलभ व्यवस्था केली जाईल, प्रत्येक प्रभागात नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची महिन्याला बैठक घेतली जाईल, आवश्यकतेनुसार शहराची हद्दवाढ करण्याबाबत कार्यवाही केली जाईल. कृष्णाजीनगरमधील रद्द झालेले प्रॉपर्टीकार्ड पुन्हा सुरु करणार असून सर्वांना सिटीसर्वेचा दाखला देण्यात येईल. महिलांसाठी नगरपालिकेत हिरकणी कक्ष कार्यान्वित केला जाईल. नगरपालिकेच्या मालकीच्या शेतजमिनीवर सेंद्रिय शेती करणार असून नगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठी नवीन कामगार कॉलनी निर्माण केली जाईल, असे सावंत म्हणाल्या.

युवकांसाठी काय?
नगरपालिकेच्या वतीने तरुणांसाठी रोजगार निर्मिती व कौशल्य विकास विभागाची माहिती व्हावी म्हणून डेव्हलपमेंट सेंटर उभारले जाईल. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना स्थानिक उद्योग, व्यापार तसेच बाहेरच्या कंपन्यांमध्ये नोकरी देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *