आंतर शालेय योगासन स्पर्धेत 400 हून अधिक विद्यार्थी सहभागी

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन आणि हरितस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाच वर्ष वयोगटातील मुलापासून १६ वर्षापर्यंतच्या 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ज्ञानदा प्रतिष्ठान शाळा, कर्वेनगर येथे ही योगासन स्पर्धा पार पडली. 

या स्पर्धेचे उद्घाटन मोनिका मुरलीधर मोहोळ, कार्डियालॉजिस्ट डॉ. ऋतूपर्ण शिंदे, अतुल पटवर्धन व सुप्रसिद्ध आर्किटेक्ट सुप्रिया पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चिल्ड्रन सायकॉलॉजिस्ट तनुजा महाजन, स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीतम थोरवे, सचिव मेघश्याम देशपांडे, प्राची देशपांडे, उमेश जाधव, हरितस चॅरिटेबल ट्रस्टचे मनाली देव, अमोल देव आदी मान्यवर उपस्थित होते. 

या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी बुद्धपद्मासन, भूमासन, उराष्ट्रासन, गोमुखासन, सर्वांगासन आणि त्रिकोणासन आधी योगासन सादर करून उपस्थितांची वाहवाह मिळविली. स्पर्धेला माईंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट पुणे यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. पुणे शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील शाळांचा सहभाग होता. स्पर्धा संपल्यानंतर मनसेचे कसबा उपविभाग अध्यक्ष सागर निपुणगे, भाजप युवा मोर्चाचे कोथरूड अध्यक्ष अमित तोरडमल, युवा उद्योजक प्रशांत टिकार, नयन ठाकूर सरचिटणीस कसबा मतदारसंघ व्यापारी आघाडी पुणे, परेश देवळणकर, संतोष उर्फ बापू मोहोळ, सचिन मोहोळ, हर्षवर्धन खिलारे पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण संपन्न झाले. 

स्पर्धेचा निकाल : नर्सरी व सीनियर केजी (मुले) : प्रथम- तनिष्क जाधव (केंब्रिज आकुर्डी), द्वितीय- मेघराज महाजन (के एच एस), तृतीय- युवराज सिंग वर्मा (एस एस आर व्ही एम). नर्सरी ते सिनियर केजी (मुली) : प्रथम- रमा बेहेरे (अभिनव विद्यालय), द्वितीय- ओवी देवल (कोलवलकर विद्यालय), तृतीय- युक्ता देशपांडे (पुणे स्पोर्ट्स अकॅडमी).

इयत्ता पहिली व दुसरी (मुले) : प्रथम- आदी कुलकर्णी (परांजपे स्कूल), द्वितीय- भारत द्विवेदी (हयुमे मॅच सेकंडरी स्कूल), तृतीय- रेशन शहा (स्टार योगा). इयत्ता पहिली व दुसरी (मुली) : प्रथम- श्रीशा गावडे (ध्रुव इन्स्टिट्यूट), द्वितीय- निहिरा गोखले (अभिनव महाविद्यालय), तृतीय- इशा रखेच्या (डी एल आर सी), चतुर्थ- रमा कणे (सिटी प्राइड स्कूल), पाचवा- ध्रुवी सोनवणे (परांजपे स्कूल). तिसरी व चौथी (मुले) : प्रथम- रुद्र इंगळे (अजय अब्दुल), द्वितीय- देवांश जोशी (पुणे स्पोर्ट्स अकॅडमी), तृतीया- अक्षय आंबेकोली (महाराष्ट्र मंडळ), चतुर्थ- अलोक पाखरे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल, पिंपरी), पाचवा – उन्नत बनसोडे (एस. एन. बी. पी. इंटरनॅशनल स्कूल). तिसरी व चौथी (मुली), प्रथम- लाईशा कार्तिकेयन (ट्री हाऊस हायस्कूल), द्वितीय- पलक दुगडे, तृतीय- ओवी माझीरे (परांजपे स्कूल), चतुर्थ – नयना धीवार (ज्युडसन हायस्कूल), पाचवा – आरोही कानडे (परांजपे स्कूल).

पाचवी ते सातवी (मुले) : प्रथम- अर्णव पाटील (माउंट कॅरमल पब्लिक स्कूल), द्वितीय- अर्णव कोरडे (के एच एस), तृतीय – ध्रुव आचार्य (जय हिंद हायस्कूल), चतुर्थ – अर्चित पाटील (पोद्दार इंटरनॅशनल), पाचवा – शौर्य चव्हाण (इंटेलिजंट कॅडेट). पाचवी ते सातवी (मुली) : प्रथम – निरल वाडेकर, द्वितीय – सचीता पवार (एस एन बी पी, चिखली), तृतीय – अदिती माने (परांजपे स्कूल), चतुर्थ – अवणी कुलकर्णी (न्यू इंडिया स्कूल), पाचवा – अदिती तोरस्कर. आठवी ते दहावी (मुले) : प्रथम – उत्कर्ष चव्हाण (आय सी आय एस), द्वितीय – हर्षवर्धन कंद (आय सी आय एस), तृतीय – समर्थ खोले (परांजपे स्कूल). आठवी ते दहावी (मुली) : प्रथम – गार्गी भट (अभिनव विद्यालय), द्वितीय – मीरा अभ्यंकर (बाल शिक्षण मंदिर), तृतीय – रितिका इंगलगावकर (के एच एस), चतुर्थ – हृचा सेथिया (परांजपे  स्कूल), पाचवा – अनुष्का गुडमेवकर (के एच एस).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *