करमाळा (सोलापूर) : करमाळा शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्यांपैकी मंगळवार पेठेतील क्षत्रीय महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे शुशोभीकरण करण्यात यावे. त्यासाठी खासदार निधी देण्यात यावा, अशी मागणी जगताप गटाचे शंभूराजे जगताप यांनी केली आहे. भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना त्यांनी याबाबत निवेदन दिले आहे.
या पुतळ्याजवळ नगरपालिकेची खुली जागा आहे. कंम्पाऊंड छोटे असल्याने रजपूत बांधवांच्या सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाला जागा अपूरी पडत आहे. तसेच पुतळ्याचेही सुशोभिकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी १० लाख निधी उपलब्ध करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदन देतेवेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा, जगताप गटाचे पश्चिम भागाचे नेते आण्णासाहेब पवार उपस्थित होते.