रोहित पवार फाउंडेशनच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी मुस्तकीम पठाण

करमाळा (सोलापूर) : रोहित पवार फाउंडेशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी मुस्तकीम पठाण यांची निवड झाली आहे. या निवडीचे पत्र रोहित पवार फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे प्रदेशाध्यक्ष ऋषिकेश करभाजन यांनी दिले. करमाळा शहर व तालुक्यात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन व सर्व समाज घटकांशी असणारी सामाजिक बांधिलकी व अन्यायाविरुद्ध लढणारा लढवय्या कार्यकर्त्याला करमाळा तालुक्याची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सकल मुस्लिम समाज करमाळाचे मार्गदर्शक कलिम काझी, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, माजी उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी, अर्बन बँकेचे माजी संचालक फारूक जमादार, जमिएत उलमा हिंदचे तालुकाध्यक्ष मौलाना मोहसीन, समीर शेख, सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद, ओबीसी ऑर्गनायझेशनचे तालुकाध्यक्ष ऍड. नवीन काझी, ऍड. आलिम पठाण, प्रा. इब्राहिम मुजावर, रहनुमा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सुरज शेख, रमजान बेग, इक्बाल शेख, अतीक बेग, सादिक शेख, जावेद सय्यद, इमरान शेख, इमित्याज पठाण, अलीम खान, अरबाज बेग, शाहीद बेग, कलीम शेख, फिरोज बेग, कलंदर शेख यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *