आमदार रोहित पवारांना ‘झेड प्लस’ सुरक्षा द्या : मुस्तकीम पठाण यांची मागणी

करमाळा (सोलापूर) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे, ही नागरिक व कार्यकर्त्यांची भावना आहे. संबंधित विमान दुर्घटना अपघात होता की घातपात? याचा उलगडा व्हावा यासाठी आमदार रोहित पवार जीवाची पर्वा न करता लढा देत आहेत. या भूमिकेमुळे त्यांच्या जीवितास संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना ‘Z+’ दर्जाची सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी रोहित पवार फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष मुस्तकीम पठान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जमिर सय्यद, रमजान बेग, ईमत्याज पठान, ईकबाल शेख, अरबाज बेग, शाहीद बेग, कलीम शेख, निहाल शेख, फरदीन बागवान, अमोल सुरवसे, आमिर सय्यद, जावेद पठान, सारंग परदेशी, जगदीश शिंदे, गणेश कोकाटे, अभिजीत चव्हाण, नागेश कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *