सोलापूर : जिल्हा माहिती कार्यालय येथे संदेशवाहक पदावर कार्यरत असलेले अनिल नलावडे यांची जिल्हा माहिती कार्यालय, सातारा येथे लिपिक टंकलेखक या पदावर पदोन्नतीने बदली झाली आहे. नलावडे यांनी जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर, उप माहिती कार्यालय, पंढरपूर येथे कामकाज केले आहे. जिल्हा माहिती कार्यालयातील नलावडे हे अत्यंत शांत, संयमी व सहकार्याची भावना जपणारे अशी त्यांची ओळख होती. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने त्यांचा निरोप सभारंभाचा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. वरीष्ठ लिपिक शरद नलावडे, मिलिंद भिंगारे, लिपिक संजय घोडके, प्रविण डफळ यावेळी उपस्थित होते.
