करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोठेही कमी पडलो नसून जनहिताची व व्यक्तिगत कामे करताना कधीही राजकारण केले नाही. त्यामुळे मला पुन्हा एखादा संधी द्या, असे आवाहन करत आरोग्य, रस्ता, वीज व शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, असे आश्वासन आमदार संजयमामा शिंदे यांनी दिले आहे.
Karmala Politics चिवटे बागलांवर नाराज! निवडणुकीत काम करतील का?
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदार शिंदे यांचा प्रचारदौरा सुरु आहे. मलवडी येथे शिंदे गटात कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आमदार शिंदे म्हणाले, २०१४ मध्ये करमाळा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. त्यानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना करमाळा तालुक्याला भरघोस निधी दिला. २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि आमदार केले. कोरोना कालावधी आणि सत्तांतरे हा ऐतिहासिक कालावधी असतानाही विकास कामे केली आहेत. आणखी कामे करायची आहेत त्यामुळे प्रवेश केलेल्या व माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहवे, असे ते म्हणाले.
बागलांचे खच्चीकरण करण्यासाठी मकाई व आदिनाथचे बळी; रश्मी बागल यांच्याकडून टीकास्त्र
मलवडीत पै. बंडुनाना कोंडलकर, साहेबराव दुरगुळे आदींनी यावेळी शिंदे गटात प्रवेश केला. विजय पालवे, गुरुनाथ पालवे, राघू कोंडलकर, रमेश कोंडलकर, आबा कोंडलकर, रेवणनाथ कोंडलकर, सर्जेराव कोंडलकर, रवींद्र पालवे, सर्जेराव बागल, पप्पू कोळी, कल्याण सातव यांच्यासह पाथुर्डी येथील सदाशिव तोडेकर, हनुमान तोडकर आदींनी आमदार शिंदे गटात प्रवेश केला.
माजी आमदार जगतापांची शनिवारी करमाळ्यात तोफ धडाडणार
गोकुळ पाटील, ज्ञानेश्वर शेलार, उध्दव माळी, चंद्रहास निमगिरे, विलास पाटील, तानाजी झोळ, उमेश इंगळे, राजेंद्र बारकुंड, लक्ष्मण पाटील, प्रविण पाटील, धनंजय मोरे, मारुती पारखे, अच्युत तळेकर, किरण फुंदे, रवींद्र वळेकर, विलास राऊत, गुलाबराव देवकते, भाऊसाहेब खरात, अभिजित तळेकर, चेतन पाटील, सनी टकले, महावीर कोंडलकर, शहाजी कोंडलकर, सिध्दूभाऊ मोटे, मयुर रोकडे, अशोक तकिक, गौतम ढाणे, रोहिदास सलगर, स्वप्निल पाडुळे, धनाजी ननवरे, शरद काळे, रामभाऊ लवळे, सतीश पन्हाळकर, धनाजी शिंदे, गोरख तळेकर, नंदकुमार जगताप आदी उपस्थित होते.