आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता ‘गौरीशंकर’ या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहेत. नव्या दमाचे कलाकार असलेला ‘गौरीशंकर’ हा चित्रपट २८ फेब्रुवरीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.
मुव्ही रूट प्रस्तुत आणि ऑरेंज प्रोडक्शन निर्मिति संस्थेअंतर्गत ‘गौरीशंकर’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून विशाल प्रदीप संपत हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हरेकृष्ण गौडा यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन, रोशन खडगी यांनी छायाचित्रण केले आहे.संकेत कोळंबेकर यांनी लिहिलेल्या गीतांना अमित जवळकर यांनी संकलन, प्रशांत निशांत यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. या चित्रपटात हरेकृष्ण गौडा, दक्षिणा राठोड, काव्या (कविता) सूर्यवंशी वसानी, राहुल जगताप या नवोदित कलाकारांच्या दमदार भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहेत.
‘गौरीशंकर’ या चित्रपटातली कथा आहे गौरी आणि शंकर यांच्या प्रेमाची… दुर्दैवानं त्यांच्या प्रेमात एक संकट निर्माण होते. त्याच्यावर आलेल्या संकटाचा प्रतिशोध घेण्याचा प्रयत्न या आशयसूत्रावर ‘गौरीशंकर’ हा चित्रपट बेतला आहे. नव्या दमाचे कलाकार हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे एक थरारक, रोमांचक मनोरंजक कथानक मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी ‘गौरीशंकर’ प्रदर्शित होण्याची रसिकप्रेक्षकांना अजुन थोडी वाट पहावी लागणार आहे.