करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे एप्रिलमध्ये काढण्यात आलेले आरक्षण रद्द झाले आहे. आता मंगळवारी १५ जुलैला नव्याने ही आरक्षण सोडत होणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने ही आरक्षण सोडत होणार आहे, अशी माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलला दिली आहे.
ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाच्या अमंलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही नव्याने आरक्षण सोडत होणार आहे. तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एप्रिलमध्ये आरक्षण सोडत झाली होती. ग्रामविकास विभागाच्या आदेशाने पुन्हा ही आरक्षण सोडत होणार आहे. गावागांमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे भावी सरपंचांना वेध लागले आहेत. त्यात आरक्षण सोडत होऊन त्यात इच्छेप्रमाणे जिथे आरक्षण पडले नव्हते त्या भावी सरपंचांचा हिरमुड झाला होता. मात्र आता पुन्हा आरक्षण सोडत होणार असल्याने त्यांना लॉटरी लागणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.