‘करमाळ्याचा वाघ आमचा संजयमामा संजयमामा…’ आमदार शिंदे यांच्या नावाचे गाणे लॉंच

New song in the name of MLA Sanjaymama Shinde

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसात जाहीर होईल अशी शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेते तयारीला लागले आहेत. डिजिटल प्रचारासाठी वेगवेगळी माध्यमे वापरली जात आहेत. अशातच आमदार संजयमामा शिंदे यांच्या नावावर नवीन गाणे आले आहे. त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेकांच्या मोबाईलवर हे गाणे वाजू लागले आहे. पाच वर्षात केलेल्या कामाच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे यामध्ये वापरली आहेत. त्यात ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने तयार केलेले ‘आमदार शिंदेंच्या कर्तुत्वाचा रोडमॅप’ हेही डिजिटल पेज व्हायरल झाले आहे.

‘करमाळ्याचा वाघ आमचा संजयमामा संजयमामा… गोरगरिबांचा कैवारी आमचा संजयमामा…त्यांच्या हाती शक्ती किती मन मोठं स्वप्न नवं… मराठी मातीचा मर्दाना बोलतो तो पाण्यासारखा… आमचा मामा जयघोष हो… गावभर त्याची चर्चा हो… आमच्या सर्वांच्या लाडका आहे..’ असे या गाण्याचे बोल आहेत. १.२८ मिनिटाचे हे गाणे आहे. सोशल मीडियावर हे गाणे प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *