करमाळा (सोलापूर) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणीचे वारकऱ्यांना दर्शन घेता यावे म्हणून मध्य रेल्वेच्या हडपसर ते मिरज दरम्यान सोमवार (ता. १५) ते शनिवारपर्यंत (ता. २०) विशेष पॅसेंजर रेल्वे चालणार आहे. त्या गाडीला करमाळा तालुक्यातील जेऊर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जेऊर स्थानकावर पंढरपूरला जाण्यासाठी ही गाडी दुपारी १२ वाजता असेल तर पंढरपूर येथून सायंकाळी साडेसात वाजता निघणार असून जेऊर स्थानकावर रात्री साडेनऊ वाजता येणार आहे.