राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यात शुक्रवारी मिरवणूक

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका अहिल्यादेवी जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. २६) दुपारी ४ वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक निघणार आहे. आमदार संजयमामा शिंदे, मनोहरमामा भोसले, बापू बिरू वाटेगावकर यांचे नातू अण्णा महाराज वाटेगावकर व धनगर समाज युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष घनश्याम हाके यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने ही मिरवणूक निघणार आहे.

बायपास चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा- सुभाष चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे येऊन गायकवाड चौकात ही मिरवणुक समाप्त होणार आहे. दोस्ती डीजे, दोस्ती बँजो, केम येथील सैराट हलगी ग्रुप, शेटफळ येथील नागनाथ लेझीम पथक, जिंती येथील लहू क्रांती हलगी ग्रुप, शाही घोडे, ढोल व ताशा असे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असणार आहे, यामध्ये जास्तीत जास्त बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *