करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात नायलॉन मांजाने एकजण जखमी झाला आहे. त्याच्या नाकावर जखमी झाली असून श्री देवीचामाळ रस्त्यावरील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करून घरी पाठवण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. जखमी व्यक्ती करंजे येथील असल्याचे समजत आहे. त्यांची इतर माहिती समजू शकलेली नाही.
पंतग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाच्या विक्रीसाठी बंदी आहे. मात्र हा मांजा करमाळ्यात विक्री होत असल्याचे सांगितले जात आहे. या मांजामुळे पक्षी अडकतात. नागरिकही जखमी होत आहेत. याच्यापासून धोका टळावा म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. पतंग उडविताना तुटलेला मांजा रस्त्यावरून जाणारे नागरिक, मोटारसायकलस्वार यांना जखमी करत आहे. दुर्दैवी घटना घडू नये म्हणून वेळीच दक्षता घेणे आवश्यक आहे.
पोलिस निरीक्षक रणजित माने म्हणाले, ‘करमाळा येथे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याचा शोध घेतला जाईल. धोकादायक आणि बेकायदा वस्तूची कोणीही विक्री करू नये. मानव व पशुपक्षी यांच्या जीवितास धोका होईल असा मांजा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.