युवा भिम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने अमोल जाधव यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ पुरस्कार

Outstanding Social Worker Award to Amol Jadhav on behalf of Yuva Bhim Sena Social Organization

करमाळा (सोलापूर) : युवा भिम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने अमोल जाधव यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ पुरस्कार देण्यात आला आहे. सोलापूर येथील समाज कल्याण केंद्र (रंगभवन चौक) येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमोल जाधव यांचे करमाळा शहर व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमात नेहमीच सहभाग असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेत युवा भिम सेना या सामाजिक संघटनेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. या कार्यक्रमात राज्यभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. अमोल जाधव यांना उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल युवा भिम सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *