खासदार शरद पवार यांच्या आशीर्वादाने कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेत पाटोदा येथे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर हे आज (रविवारी) सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्ते, प्रवक्ते महेश तपासे, माजी आमदार सलीम सय्यद, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, पाटोदामधील महाविकस आघाडीतील घटक पक्षांचे प्रतिनिधीही यात्रेत सहभागी झाले आहेत.
युवा संघर्ष यात्रेत आमदार क्षीरसागर यांचा सहभाग
