पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे जेऊरमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व शिवसृष्टीसाठी ७५ लाखाच्या निधीची मागणी

जेऊरमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा व शिवसृष्टीसाठी ७५ लाखाचा निधी मिळावा, अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

हिवाळी अधिवेशनात माजी आमदार नारायण पाटील यांनी नागपूर येथे जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी करमाळा मतदार संघातील रखडलेल्या विकासकामांना निधी मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली. जेऊर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा जेऊर ग्रामपंचायतीचा संकल्प असून यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या व समतीसाठी राज्य सरकारचे सहकार्य आणि पुतळा व शिवसृष्टीसाठी ७५ लाख निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जेऊर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ व पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा माजी आमदार नारायण पाटील यांचा मानस अनेक वर्षा पासून आहे. यासाठी जेऊर ग्रामपंचायत यांचे कडून जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच माजी आमदार नारायण पाटील यांनी स्वतः काही नामांकित व पारंगत अशा शिल्पकारांची भेट घेऊन याबाबत माहिती घेतली. परंतु विविध शासकीय परवानग्या आणि निधी याबाबत राज्य सरकारचे सहकार्य मिळावे म्हणून त्यांनी आता थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे साकडे घातले आहे. यामुळे लवकरच हा पुतळा उभा राहणार अशी आशा शिवप्रेमी आणि जेऊर परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *