करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र झाले. याचे उदघाटन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते झाले. ‘२००० नंतरचे ग्रामीण कविता’ या विषयावर आधारित चर्चासत्राच्या कार्यक्रमास बीजभाषक म्हणून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव तथा भाषा दक्षता अधिकारी डॉ. शिवाजी शिंदे उपस्थित होते.
डॉ. शिंदे म्हणाले, ‘ग्रामीण कवितेतून शेतकऱ्यांची दुःख वेदना याचे वास्तव चित्रण कवितेतून दिसून येते. जागतिकीकरणाचा परिणाम ही ग्रामीण कवितेवर झालेला दिसून येतो.’ या कार्यक्रमास प्रा. डॉ. सुवर्णा गुंड उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील होते. चर्चासत्रात शोधनिबंध वाचकांनी आपले शोधनिबंध वाचले. दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. संजय चौधरी होते. कार्यक्रमास विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रम सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. नितीन तळपाडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे, डॉ. वंदना भाग्यवंत, डॉ. चारु देवकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. कृष्णा कांबळे, प्रा. गौतम खरात, प्रा. डॉ. अंकुश करपे, प्रा. डॉ. विनायक खरटमल, प्रा. महेश जगताप, प्रा. हर्षद जाधव, प्रा. ऋषी माने, प्रा. दीपक सोनवणे यांनी परिश्रम घेतले.