घोटी येथील कार्यकर्त्यांचा आमदार शिंदे यांना पाठींबा

Politics Workers from Ghoti support MLA Sanjay Shinde

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील घोटी येथील अनेक कार्यकर्त्यांनी आज (शनिवारी) निमगाव येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश करून पाठींबा दिला आहे.

यावेळी जनसेवा पार्टीचे प्रमुख विष्णू ननवरे, ओबीसी नेते धनाजी ननवरे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ ननवरे, प्रदीप वाघमारे, दत्तात्रय क्षीरसागर, सागर ननवरे, अनिल राऊत, कुंडलिक ननवरे, आजिनाथ ननवरे, नवनाथ यादव, शिवाजी कानडे, रमेश ननवरे, उमेश ननवरे, संतोष कानडे, गजेंद्र शेंडे, महेश राऊत, भालचंद्र राऊत यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.

आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते सर्वांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. पुढील काळात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार शिंदे यांनी दिले. घोटीचे सरपंच विलास राऊत म्हणाले, प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यामुळे आमचे बळ वाढले आहे. त्यामुळे घोटीतून आमदार शिंदे यांना सर्वाधिक मतदान देणार आहे.

जिल्हा परिषदचे माजी सदस्य उध्दव माळी, कुर्डूचे सरपंच बाळासाहेब जगताप, निंभोरेचे सरपंच रविंद्र वळेकर, बारलोणीचे माजी सरपंच संजय लोंढे, बारलोणीचे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ आतकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष नवले, कोर्टीचे सुभाष अभंग, बाळराजे माळी, कन्हेरगावचे धनंजय मोरे, विनायक राऊत, कांतीलाल राऊत, अमोल भोसले, प्रशांत शेंडे, राजेंद्र भोसले, अक्षय खरात आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *