करमाळा (सोलापूर) : केम येथे श्री उत्तरेश्वर महाराज देवस्थान यात्रेनिमित्त प्रहार व श्री उत्तरेश्वर परिवर्तन ग्रुपच्या वतीने ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आला. प्रहारचे करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांच्या पुढाकारातून हे अभियान राबविण्यात आले.
केम हे कुंकूसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. या गावामध्ये श्री उत्तरेश्वर मंदिर ग्रामदैवत म्हणून मानले जाते. परिसरातील भक्त येथे दर्शनासाठी येतात. येथे मोठी यात्रा भरली जाते. त्यासाठी प्रशासन देखील श्री उत्तरेश्वर देवस्थान मंदिरातील परिसर स्वच्छ करत असते. यात्रेनिमित्त संत गाडगेबाबा महाराज ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत श्री उत्तरेश्वर परिवर्तन ग्रुपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, केम ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सामाजिक, राजकीय, व्यापारी, देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने आहे स्वच्छता करण्यात आली.
यावेळी बापू तळेकर, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर दौंड, श्री उत्तरेश्वर परिवर्तन ग्रुपचे अच्युत पाटील, शिवसेना जिल्हा समन्वयक सागर तळेकर, महावीर तळेकर, महेश तळेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन रणशिंगारे, सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब देवकर, चंद्रकांत दोंड, उपसरपंच सुलतान मुलानी, आनंद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सागर कुरडे, पिंटू ओहोळ, गोरख पारखे, दादासाहेब गोडसे, योगेश ओहोळ, विष्णू अवघडे, युनूस पठाण, दादा दुर्गुळे, बाळू तळेकर उपस्थित होते.