करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत ढाळे यांची निवड करण्यात आली आहे. ढाळे हे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे समर्थक आहेत. या निवडीनंतर ढाळे यांचा नगराध्यक्षा मोहिनी सावंत व उपनगराध्यक्ष अतुल फंड यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी सत्कार केला.
करमाळा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष निवडीवेळी विरोधीपक्षनेताही निवडण्यात आला. यावेळी भाजपचे गटनेते दीपक चव्हाण, करमाळा शहर विकास आघाडीचे गटनेते संजय सावंत यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. करमाळा नगरपालिकेत भाजपचे सात, शिवसेनेचे पाच व करमाळा शहर विकास आघाडीचे आठ नगरसेवक व नगराध्यक्ष असे संख्याबळ आहे. यावं यावेळी शहराच्या विकासाला कायम पाठींबा राहिले, असे ढाळे यांनी सांगितले.
